सेमीकंडक्टर गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील   

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत भारतातील सहाव्या सेमीकंडक्टर युनिटच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. याचे उत्पादन २०२७ पासून सुरू होणार आहे. हे नवीन युनिट उत्तर प्रदेशातील जेवर येथे असेल. एचसीएल ग्रुप आणि फॉक्सकॉन यांच्यातील सुमारे तीन हजार ७०६ कोटी गुंतवणुकीचा हा संयुक्त उपक्रम असणार आहे.
 
एचसीएल ही हार्डवेअर विकसित करुन त्याचे उत्पादन करणारी मोठी कंपनी आहे. फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जागतिक स्तरावरील प्रमुख कंपनी आहे. ते एकत्रितपणे यमुना एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणमध्ये जेवर विमानतळाजवळ एक प्लांट उभारणार आहेत. 

दोन हजार नोकर्‍या उपलब्ध होणार

हे उत्तर प्रदेशातील पहिले चिप युनिट असणार असेल, असे केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितले. या प्लांटमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाइल्स, पीसी आणि डिस्प्ले असलेल्या असंख्य इतर उपकरणांसाठी डिस्प्ले चिप्स तयार केल्या जातील. यातून सुमारे दोन हजार नोकर्‍या उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात केलेल्या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशच्या यमुना प्राधिकरण क्षेत्रात सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. 
 

Related Articles